शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीची १० रोजी बैठक ;

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रश्न त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस, केळी, सोयाबीन व सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. या शेतकऱ्यांच्या अडचणींनी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता “शेतकरी जनआक्रोश मोर्चा” काढण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रमुख मागण्य

निवडणुकीवेळी घोषणा केलेली सरसकट शेतकरी कर्जमाफी.

फळ पिक विमा नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे बाबत.

कापूस,सोयाबीन, उडीद,मूग, मका इ. पिकांचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे निकष पूर्ववत करणे बाबत.

तसेच उत्पादित शेतमाला नसलेला भाव, शासनाने कापूस पिकावर काढून घेतलेले आयात शुल्क, पावसाच्या खंड त्यामुळे झालेले नुकसान, मागील पंधरवड्यात झालेली अतिवृष्टी त्यामुळे झालेले शेती पिकाचे नुकसान. इतर सर्व समस्या याबाबत “शेतकरी जनआक्रोश मोर्चा” संदर्भात चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी राजकीय पक्षविरहित “नियोजन बैठक” दिनांक १० सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी १० वा अजिंठा शासकीय विश्रामगृह,जळगाव या ठिकाणी आयोजित केली असून या बैठकीस जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीने केले आहे .