भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर ह्या होत्या,व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले,कार्यालयीन अधीक्षक सविता सहजे यांच्या सोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रिन्सिपल निना कटलर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
प्रसंगी प्रिन्सिपल निना कटलर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली.सूत्रसंचालन सोफिया पीबॉडी यांनी तर आभार शेख कय्यूम यांनी मानले.सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिना निमित्त द्वीपप्रज्वलन करताना प्रिन्सिपल निना कटलर सोबत डावीकडून मनप्रीत कौर,कमल नेहेते,वर्जिनिया बनार्ड,हर्षला चौधरी,मनिषा किरंगे,जयश्री मोरेस्कर,प्रतीभा काकडे,गायत्री घिर्णीकर,सोनाली शिवरामे,सविता सहजे,श्रद्धाली घुले,सोनाली मुजुमदार,स्मिता जाधव आदी दिसत आहे.


