भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील एका महिलेस व त्यांच्या भावास मध्यरात्री दारूच्या नशेत घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संशयितआरोपी दामोदर नथ्थू पाटील (राजपूत) याच्या विरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता संशयित आरोपी दामोदर नथु पाटील (रा. केशर नगर, जामनेर रोड, भुसावळ) हा दारूच्या नशेत महिलेच्या घरात अनधिकृतरित्या शिरला. त्याने घरात प्रवेश करताच महिलेच्या कानशिलात लागवली. तसेच अश्लील शिवीगाळ करून तिचा हात पकडला.या घटनेदरम्यान महिलेच्या भावालाही दामोदर पाटील याने मारहाण केली. घटनेनंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.सदर महिलेच्या घरी सत्यनारायण पुजा असल्याने घरी आल्या असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे . महिलेची तक्रार जबाब दोन महीला पोलीसासमोर घेण्यात आला आहे
या प्रकरणी महिलेने १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बाजार पेठ पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय सहींता कलम ७४ ३५१ ३५२ ३५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख तपास सुरू आहे .



