भडगाव –
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी पवन
ओंकार पाटील याने दि,28/7/25 वार सोमवारी संध्याकाळी आपला शामी गोंडाचा बैल ( भारत ) विकला तब्बल 10लाख ,51000 पवन हा शामी गोंडा शौकीन आहे त्यामुळे लहान छोटे गोऱ्हे घेऊन यावे व त्यांना मोठे करून शामी गोंडाची ट्रेनिंग देऊन त्यांना शहरातल्या पुणे , मुंबई , सातारा इकडचे सेमी गोंडा शौकिकांना विकायचे . गोंडगावच्या पवन पाटलाची ही ओळख असून त्यांचे जोडीला गुरू म्हणुन माजी लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा शामि गोंडा किंग म्हणजे आप्पा होय . हा बैल आप्पांच्या मध्यस्थीने कराड येथील प्रशांत दिसले शामि गोंडा किंग यांना विकण्यात आला हा बैल उर्फ (भारत) याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्या सह खान्देशासह परिसरात भरपूर ठिकाणी प्रथम क्रमांकाने शर्यती जिंकली आहे यामुळेच या बैलाला म्हणजेच (भारत) याला एवढी किंमत मिळाली शेतकऱ्याने आनंदाच्या भरात गोंडगाव गावात डीजे लावून या बैलाची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला यावेळेस गावातील भैय्या पाटील, कजगाव येथील अण्णा बोरसे, यांच्यासह सेमी गोंडा शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



