शिक्षक अतिरिक्त ठरविण्याला अजूनही उच्च न्यायालयाची स्थगिती – प्र. ह.दलाल

भुसावळ (प्रतिनिधी) –
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सन२०२५ ची संचमान्यता ठरविण्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ५४५६/२०२५ द्वारा आव्हान देण्यात आले आहे.त्यावर न्यायालयाने २३ एप्रिल २०२५ रोजी पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिलेली होती पुढील सुनावणी १६ जून २०२५ रोजी नियोजित होती.तथापि वेळेअभावी १६ जून रोजी ही सुनावणी होऊ शकली नाही.पुढील तारीख आज उद्या मिळेल.अर्थात त्यामुळे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या बदल्या,सेवा ज्येष्ठता,आणि शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे इत्यादी संबंधित कोणतीही कार्यवाही आता पुढील सुनावणी होईपर्यंत कोणीही करू शकणार नाही.आणि तरीही कोणी केल्यास तो न्यायालयाचा अपमान ठरेल
सर्व शिक्षक बंधू भगिनी याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षकांचे ज्येष्ठ नेते प्र. ह.दलाल यांनी केले आहे.मुख्याध्यापक/ संस्थाध्यक्ष अथवा सचिव/ शिक्षणाधिकारी यांपैकी कोणीही तुम्हाला अतिरिक्त ठरवीत असेल किंवा त्यानुसार तुमची सेवाज्येष्ठता ठरवीत असतील,तर त्यांना लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्वरित आक्षेप नोंदवावा व दिलेल्या अर्जाची त्यांचेकडून पोच घ्यावी. ह्या संदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिनांक २८ मे २०२५ रोजीच राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांना उद्देशून काढलेल्या पत्रात ही स्पष्ट म्हटले आहे की,शासनाच्या२४ मार्च २०२४ च्या शासन आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिलेली असल्याने न्यायालयाचा अपमान होईल अशी कृती कोणी करू नये ज्या शिक्षक बंधू भगिनींना याबाबत अधिक माहिती किंवा मदत हवी असेल त्यांनी समक्ष भेटावे किंवा भ्रमण ध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहनही प्र. ह.दलाल यांनी केले आहे.