यावल – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये ताप, गलगोट, तोंडखुरा, लम्पी स्किन अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी पशुसंवर्धन विभागाला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

त्यांनी जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पावसाळ्यापूर्वी गायी, म्हशी, बकरी, बैल यांसह सर्व जनावरांची आरोग्य तपासणी, लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबवण्याचे आदेश दिले आहेत.
जनावरांचे संरक्षण ही शेतकऱ्यांची आर्थिक शाश्वतेची गुरुकिल्ली – आमदार जावळे
“शेतकऱ्यांचे पशुधन हे त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी वेळेवर उपाययोजना आवश्यक आहेत,” असे सांगत आमदार जावळे यांनी ग्रामपंचायती व पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून गावागावात जनजागृती मोहिम राबवण्याचे आवाहन केले.
प्रमुख सूचनांमध्ये हे उपाय समाविष्ट:संभाव्य रोगांसाठी आरोग्य तपासणी
लसीकरण व जंतनाशक औषधोपचार गोठ्यांची स्वच्छता व कीटकनाशक फवारणीलक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार पशुसंवर्धन विभागाने या सूचनांची तातडीने अंमल बजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनी व्यक्त केली आहे.


