भुसावळ:येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश फालक,सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा, प्रिन्सिपल नीना कटलर उपस्थित होते.
याप्रसंगी इयत्ता दहावीत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला.या सन्मानाने विद्यार्थी भारावून गेले होते.यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक व प्रिंन्सिपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.प्रसंगी विद्यार्थ्यांनी व पालकांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफिया पी बॉडी यांनी तर आभार प्रिंसीपल निना कटलर यांनी मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत मोहन फालक,महेश फालक,विष्णू चौधरी,संजय कुमार नाहाटा, प्रिंन्सिपल निना कटलर आदी.


