भुसावळ – द. शि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया भुसावळ तर्फे पी एमश्री योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले होते.

या कार्यक्रमांतर्गत डॉ. प्रियंका चिखले तसेच परिचारिका डिंपल चौधरी यांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली..विद्यार्थ्यांना आवश्यक ते विटामिन्स, तसेच शक्तीवर्धक पावडर देण्यात आले…शाळेतर्फे विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव संजय मंदवाडे सर, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य गीता सभाधेंडे,जेष्ठ शिक्षक व्ही पी सुलताने,उत्सव समितीचे प्रमुख एम एम चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती सीमा बोरोले यांनी केले..


