भुसावळ : ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलने भुसावळ सह संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणे चांगले विद्यार्थी घडविणे हे ध्येय या संस्थेचे आहे. या शाळेत लांब लांबून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. यात जे विद्यार्थी विकलांग आहे त्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने शाळेत पहिल्यांदा लिफ्ट लावली आहे. ताप्ती पब्लिक स्कूल ही भुसावळातील पहिली एकमेव अशी संस्था आहे की जिने विद्यार्थ्यांसाठी लिफ्ट लावली आहे. विकलांग विद्यार्थ्यांना जिन्याने वर वर्गात जाण्यासाठी त्रास होत होता.तर त्यांना वर्गात जाण्यासाठी सोय व्हावी म्हणून ताप्ती पब्लिक स्कूलने शाळेत लिफ्ट लावली. शाळेच्या ग्राउंड फ्लोअर पासून तर तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी लिफ्ट लावली आहे.या लीफ्टचे उद्घाटन ताप्ती पब्लिक स्कुल चे माजी विदयार्थी यशोधन फालक व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. पालक वर्ग लिफ्ट लावल्याने उत्साही होते. यावेळी प्रिन्सिपल निना कटलर,चीप ओएस सविता सहजे,व्हाईस प्रिंसीपल मनप्रित कौर,राहुल नेमाडे आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये लिफ्टचे उद्घाटन करताना माजी विद्यार्थी यशोधन फालक सोबत प्रिन्सिपल निना कटलर व इतर.



