भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या चौथ्या दिवसाचे सत्र आज नाहाटा महाविद्यालयात संपन्न झाले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ममताबेन पाटील होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते अर्थशास्त्र विभागातील प्रा. अक्षरा साबळे या होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही.ए.सोळुंके, विद्यार्थी विकास सहाय्यक महिला अधिकारी प्रा.संगीता भिरुड उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील अडकमोल यांनी केले.
तर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.अक्षरा साबळे यांनी “आर्थिक वर्ष 2025 26 साठी मांडलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा असल्याचे मत प्रतिपादित केले. उद्योगाच्या अनुषंगाने महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारने प्राधान्य दिलेले दिसते. तसेच निर्यातवाढीवर भर देऊन मेक इन इंडिया धोरणाला सरकार बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण,आरोग्य इत्यादी क्षेत्रात ए आय वर गुंतवणुकीचा भर असेल असे सुतोवाच केले आहे. भारताला टॉईज वर्ड हब बनविण्याचा उद्देश नक्कीच रोजगार वृद्धी करेल असा विश्वास” त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोप करताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ममताबेन पाटील यांनी “अर्थसंकल्पातून देशाच्या आर्थिक, सामाजिक धोरणाची दिशा समजत असल्याने त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक असते. येणाऱ्या वर्षात कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक व रोजगार वाढणार आहे ते लक्षात घेऊन त्या पद्धतीने मनुष्यबळ विकसित होणे गरजेचे असते”असे मत मांडले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. साक्षी धनंजय हिने केले.पाहुण्यांचा परिचय कु. विशाखा मोरे हिने दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. वैष्णवी तायडे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.एच. इंगोले, डॉ. मनोज पाटील, डॉक्टर राजेंद्र तायडे, प्रा. संगीता भिरुड,तसेच विद्यार्थी शिवाजी बिजागरे, कु. प्रियंका चंदन, कु. राखी सुरळकर, कु.पायल बारी कु.सरोज चौधरी यांनी परिश्रम घेतले.


