सावतर निंभोरा जि प शाळेस प्रिंटर व यूपीएस सप्रेम भेट;

भुसावळ – जि प प्राथमिक शाळा सावतर निंभोरा यास आय डी बी आय बँक भुसावळ यांच्याकडून आज दिनांक 28/1/2025 बुधवार रोजी ऑल इन वन प्रिंटर इस्कॉन कंपनीचे व यूपीएस देणगी स्वरूपात सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापक श्रीपाद पुंडे , तसेच बँकेतील त्यांचे सहकारी आदरणीय स्वानंद झारे व मनीष सिन्हा , सावतर निंभोरा गावाच्या सरपंच सौ साधनाताई कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर सपकाळे, .पोलीस पाटील अरुण कोळी, अनिल कोळी , सुरेश सामाजिक कार्यकर्ते, गणेश कोळी, शिक्षणप्रेमी जंगलू कोळी दादा,मुख्याध्यापक , जी एम पाटील सर तसेच सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेला प्रिंटर मिळाल्यामुळे शालेय कामकाज सोपे होणार आहे व त्यामुळे सर्व विद्यार्थी डिजिटल शिक्षणाकडे शिक्षणाकडे वळतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निंभोरे सर यांनी केले.आभार पाटील सर यांनी केले.