भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाचे सत्र आज नाहाटा महाविद्यालयात संपन्न झाले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी.एच. बरहाटे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते खान्देशातील महिला उद्योजक सौ. सुनीता जोशी या होत्या व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही.ए.सोळुंके, डॉ. विद्या पाटील, डॉ.ममता पाटील, प्रा.संगीता भिरुड हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. ए. सोळुंके यांनी केले.
तर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महिला उद्योजक सौ सुनीता जोशी यांनी “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या अवतीभवती असणाऱ्या नैसर्गिक तथा भौतिक उपलब्धतेतून स्वयंरोजगारासाठीच्या संधी ओळखाव्या , त्यातून उद्योग व्यवसाय उभारावा” असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या अनुभवांचे दाखले देत ‘कितीही संकटे आली, वादळे आली तरी डगमगून न जाता त्यातून मार्ग काढत पुढे जाणे हेच युवतींनी अंगी बानले पाहिजे.निर्धार पक्का असेल तर यश मिळतेच “असा मंत्र त्यांनी विद्यार्थिनींना दिला.
यावेळी डॉ. ममताबेन पाटील यांनी “विद्यार्थिनींनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी” असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बी. एच. बरहाटे यांनी विद्यार्थिनींनी उद्योजकता गुण अंगी बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे मत नोंदवले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. संध्या वराडे हिने केले.पाहुण्यांचा परिचय कु. चतुर्थी फेगडे हिने दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. विद्या पाटील यांनीकेले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संगीता भिरुड, डॉ. नीलिमा चौधरी, डॉ. एस. के. राठोड, तसेच विद्यार्थी
शिवाजी बिजागरे, कु.साक्षी जैन, कु.शारदा मराठे, कु.पायल बारी कु.सरोज चौधरी यांनी परिश्रम घेतले


