शिवसेना भुसावळ तालुक्याची 30 रोजी वरणगावला बैठक;

वरणगाव- भुसावळ तालुका शिवसेना (शिंदे गट) च्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांची
जिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन सर यांच्या सुचनेने भुसावळ तालुक्यातील सर्व युवा सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच शिवसैनिक कार्यकर्ते यांची महत्वाच्या बैठकीचे आयोजन आज गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बस स्टँड जवळील शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भुसावळ तालुका आढावा बैठक (मीटिंग) चे आयोजन करण्यात आले आहे.

बाबाबाबाब। या मीटिंग मध्ये सदस्य नोंदणी अभियान, गाव तिथे शाखा आणि आयत्या वेळेवरचे विषय घेण्यात येणार आहे. तरी भुसावळ विधानसभा तालुक्यातील सर्व शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, अल्पसंख्यांक आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या मीटिंगला उपस्थित राहावे, असे आवाहन भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा प्रभारी तालुकाप्रमुख संतोष माळी (आपला माणूस) यांनी केले आहे .