प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भुसावळतील सेंट पॉल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी काढली म्युझिकल स्केटिंग रॅली ;

भुसावळ –

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भुसावळतील सेंट पॉल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी म्युझिकल स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांनी हिरवी झंडी दाखवून सुरुवात केली.

ह्या रॅलीला बाजारपेठ पोलीस स्टेशन पासून सुरुवात करण्यात आली ,पुढे पांडुरंग टॉकीज ,जामनेर रोड अष्टभुजा देवी मंदीराजवळ रॅलीचा समारोप झाला.या रॅलीत सेंट पॉल स्कूल मधील इयत्ता पहिली ते सहावीचे विद्यार्थ्यांनी स्केटिंग करून हातात तिरंगा झेंडा घेऊन देशभक्तीची घोषणा करून जनजागृती केली , त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्केटिंग नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकली.

भुसावळात पहिल्यांदाच अशी स्केटिंग रॅली काढण्यात आली होती. रॅलीत ५० विद्यार्थी सहभागी होते. रॅलीतील विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका मीनाक्षी धांडे यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.या रॅलीत सेंट पॉल स्कूलचे सचिव समीर शेफर्ड , मुख्याध्यापिका रुबिया शेफर्ड , क्रीडा शिक्षक संध्या बनसोड ,स्केटिंग प्रशिक्षक संजय पाटील व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.