प्रियंका साेनींच्या ‘कुकुरमुत्ता’चा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्रदान : नाशिकच्या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेनलात गाैरव

जळगाव (प्रतिनिधी ) –
कवयित्री डाॅ. प्रियंका साेनी अर्थात ‘प्रीत’ यांच्या कुकुरमुत्ता’ कथासंग्रहाला नाशिकच्या विद्याेतमा फाउंडेशन आयाेजित राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्काराने गाैरवण्यात आले.
राेख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष शीतला प्रसाद दुबे अध्यक्षस्थानी हाेतेे. संमेलनाचे उद‌्घाटन के. सी. पांडेय यांनी केले. गाेखले एज्युकेशन साेसायटीचे झाेन सेक्रेटरी डाॅ. प्राे. रमा कुलकर्णी , अनिलकुमार प्रीतम यांची प्रमुख उपस्थिती हाेती. तीन सत्रात हे संमेलन झाले. कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान उमा शंकर यांनी भूषवले. निमंत्रित कवींमध्ये डाॅ. राजकुमार रंजन, ललित किशाेर, डाॅ. प्रियंका साेनी यांचा समावेश हाेता. सूत्रसंचालन डाॅ. वर्षा सिंह व सुनीता माहेश्वरी यांनी केले. नाशिक राेडवरील माहेश्वरी भवनात हे संमेलन झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष सुबाेधकुमार मिश्र, उपाध्यक्ष भरत सिंह, महासचिव डाॅ. सी. पी. मिश्र यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.