भुसावळात खून का बदला खून ; सिनेस्टाईल गोळ्या झाडून एकाची हत्या: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;


भुसावळ – शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली .ही घटना शुक्रवार १० जानेवारी रोजी घडली.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये नेहमी प्रमाणे तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख व जवाई जाकीर मेहबूब खान हे दोघे सकाळी सहा वाजेला नमाज पठण करण्यासाठी जायचे व त्यानंतर डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये नेहमीप्रमाणे चहा पित असत. मागील वर्षी खडका रोडवरील हिरा हॉल जवळ पटेल परिवारातील एका युवकांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचाच डाव मनात धरीत ” पीछले साल हमारे भाई को मार डाला “असे बोलून संशयित आरोपी तनविर मजीत पटेल,अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहिल शेख रशीद,मजीत पटेल,अदनान शेख युनूस अशांनी मिळून जाम मोहल्ला भागातील डी.डी सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख यांच्यावर बंदुकीने तीन गोळ्या झाडून खून करून पसार झाले आहे.बाजारपेठ पोलीस स्टेशनला जाकीर मेहबूब खान (वय.४५) राहणार जाम मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.सदरील खून प्रकरणातील संशयितांना एकप्रकारे आव्हान पोलिसांना दिले आहे.

सदरील घटना ही पूर्ववैमनस्यातून झालेली असून तैरींम अहमद नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख (मयत) यास मारण्यासाठी बाहेरील काही सुपारी किलर यांना बोलावून हा खून करण्यात आल्याची शक्यता आहे.खून करणारे इसमांनी उंची सहा फूट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यांनी गोळ्या झाडून कित्येक वेळेपर्यत बिनधास्तपणे शहरातच वावरत होते.सदरील घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ त्याचप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल दरम्यान जळगांव येथील ठसे तज्ञ युनिट मधील पोलीस हवालदार निलेश भावसार,किरण चौधरी, शिवदास नाईक अशांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली व नमुने घेतले. सदरील हत्या ही गोळ्या झाडून करण्यात
आली आहे.या घटनेतील संशयित आरोपींचा लवकरात – लवकर शोध घेण्याकामी वरिष्ठांचा आदेशावरून श्वान पथकास भुसावळात पाचारण करण्यात आले आहे जाम मोहल्ला परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भिती पसरली असून या भागातील अनेक व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली.

सदरील परिसर हा संवेदनशील असून झालेल्या घटनेचे काही पडसाद शहरात उमटू नये या अनुषंगाने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी होवू नये या पाश्वभूमी वर वाहतूक शाखे तर्फे बंदोबस्त होता.

” दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भुसावळ पोलीस उपविभागाला भेट दिली व पोलीस स्टेशनची पाहणी केली व उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.मात्र प्रसार माध्यमांनी तालुक्यातील गुन्हेगारी,अवैध धंदे,हद्दीपार, बनावट नोट प्रकरण,मोटरसायकल चोरी,अवैध गौण खनिज असे अनेक प्रश्न संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टाळण्यात आले.”