,
भुसावळ –
शहरातील समस्या सुटत नसल्याने भुसावळ शिवसेना ( उबाठा ) पक्षातर्फे शहरातील रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, अमृत पाणी पुरवठा, लाईट, शिक्षण, आरोग्य आदि समस्या सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलन करून निवेदने दिली आहेत. परंतु न. पा. चे अधिकारी यांनी काहीही सकारात्मक कामे केली नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही दि. ९/१/२५ ( गुरुवार ) रोजी कार्यालयात दु. १२ वाजता प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले . .

निवेदनात नमूद आहे की , भुसावळ शहरातील विकास कामांचे उद्घाटन होऊन १०० दिवस झाले तरी आता पर्यंत कामांना सुरुवात नाही ,
विधानसभा आचासंहिता लागण्यापूर्वी भुसावळ शहरात मध्ये आमदार संजय भाऊ सावकारे यांनी अनेक विकास कामांचे घाई घाई मध्ये भूमी पूजन व उद्घाटन केले परंतु आज पर्यंत यातील अनेक कामे अजूनही सुरवात सुध्धा झालेली नाही
या मध्ये भुसावळ करांचा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे अमृत २ ही योजना अमृत 2 ही 125कोटीची योजनेचे 100 दिवसापूर्वी उद्घाटन झाले परंतु आज पर्यंत ह्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली नाही त्या मुळे अमृत १ ला जसे ८ वर्ष होऊन सुध्धा अमृत १पूर्ण झालेली नाही तसेच अमृत २ चे सुध्धा होते का असा प्रश्न आता भुसावळ कर विचारात आहे
2) तसेच मुख्य बाजारामध्ये 1.5कोटी रु कॉक्रीटकरण चे उद्घाटन सुध्धा 100 दिवसापूर्वी केले परंतु आज पर्यंत ह्या कामाला सुरवांत झालेली नाही
3)तहसील ऑफिस मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवास स्थानाचे सुध्धा उद्घाटन करून जवळ जवळ १०० दिवस पूर्ण झाले तरी सुध्धा ह्या ठिकाणी एक वीट सुध्धा रचली गेली नाही
४) सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा ते गांधी पुतळा पर्यंतचा रोड चे 3.50 कोटींचे कॉक्रीटकरण टेंडर होऊन 100 दिवस पूर्ण झाले तरी सुध्धा ह्या रोड चे काम सुरू झालेले नाही
5)भुसावळ शहरातील अमर स्टोर ते बाजार पेठ पोलिस स्टेशन पर्यंतच्या रोड कॉक्रीटकरण करण्या साठी ३ कोटी मंजूर होऊन ह्या कामाचे टेंडर सुध्धा झालेले आहे तरी सुध्धा ह्या कामाची सुरवांत झालेली नाही
६) रेल्वे स्टेशन ते गडकरी पर्यंतचा रस्ता तात्काळ करावा
वरील अशी शहर विकासाची कामे उद्घाटन होऊन सुध्धा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तरी ही सर्व विकास कामे त्वरित सुरू करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या
अन्यथा शिवसेनेतर्फे आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल .असा इशारा देण्यात आला आहे . यावेळी
दिपक धांडे,निलेश महाजन,रहीम गवळी,योगेश बागुल,नरेंद्र लोखंडे,अरुण साळुंके,कारण खरारे,अब्रार ठाकरे उपस्थित होते .



