भुसावळ – श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या 358 व्या जयंतीनिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 30 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान पटना साहेब स्थानकावर रेल्वेने दोन मिनिटांसाठी तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा
12361 आसनसोल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस, 12362 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल साप्ताहिक एक्सप्रेस, 12545 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी साप्ताहिक एक्सप्रेस, 12546 लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल कर्मभूमी साप्ताहिक एक्सप्रेस, 22948 भागलपुर-सुरत द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 22947 सुरत-भागलपुर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. कृपया रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



