उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता बी. ए. प्रथमवर्षाच्या अभ्यासक्रमात ;

जळगाव – उषा हिंगोणेकर यांची “मुद्रा” ही कविता एफ. वाय. बी. ए. च्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. येथे अभ्यासक्रमात लागलीय.

उषा हिंगोणेकर या मराठी कविता प्रातांतील स्त्रीवादी जाणिवांचे कवितालेखन करणा-या लक्षवेधी कवयित्री आहेत. “मुद्रालेख”,”धगधगते तळघर”,”सगळेच पर्याय संपले आहेत” हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच ” मौनाचा उच्चार” हा नवा कवितासंग्रह प्राईम बुक्स पब्लिशिंग हाऊस, जळगाव तर्फे 8 मार्च 2025 आंतर राष्ट्रीय महिला दिनी सुप्रसिद्ध समीक्षक डाॅ.आशुतोष पाटील यांचे प्रस्तावनेसह प्रकशित होत आहे.डाॅ. गंगाधर पानतावणे,डाॅ.यशवंत मनोहर,
दा.गो. काळे,अंजली कुलकर्णी
डाॅ. फुला बागुल,डाॅ.युवराज पवार,
सदानंद देशमुख, आनंदा पाटील,डाॅ.अनंता सूर,
डाॅ.किसन पाटील, संजय चौधरी,भगवान ठग,डाॅ.छाया निकम,अशोक कोतवाल ,डाॅ. किर्ती मोरे आदी कवी/समीक्षकांनी त्यांच्या कवितेचे मराठी कविता प्रातांत अढळ स्थान अधोरेखित केलेले आहेय.

मान्यवर वाड़मयीन नियतकालिकात त्यांचे काव्य लेखनही 20 वर्षेपासून सुरू आहे.मराठी कवितेला दिले जाणारे मानाचे वाड़मयीन 16 पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.

कवियत्री उषा हिंगोणेकर यांनी अभ्यासक्रमात कवितेची दखल घेतल्या बद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव. मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि मंडळ सदस्य या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे .