भुसावळातील श्याम सतीश अग्रवाल यांचे सीए फायनल परीक्षेत दैदीप्यमान यश –


भुसावळ – येथील श्याम सतीश अग्रवाल यांचे सीए फायनल परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले .

शहरातील पूजा लॅमिनेशन & ऍडव्हर्टाईस चे संचालक तथा जेष्ठ साहित्यिक नंदलाल बन्सीलालजी अग्रवाल यांचे लहान बंधू सतीश बन्सीलालजी अग्रवाल यांचे सुपुत्र आहेत .

श्याम सतीश अग्रवाल याने अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम घेऊन सीए फायनल परीक्षा दिली व फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण होऊन दैदीप्यमान यश संपादन केले आहे . आपल्या यशाचे श्रेय त्याने समस्त गुरुजनांना व परिवाराला दिले आहे . श्याम अग्रवाल याने मिळवलेल्या या यशाबद्दल अग्रवाल समाजबांधवांसह सर्व स्तरातून कौतुक व्यक्त केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .