भुसावळ – येथील तेली समाज बांधवांतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

स्थानिक तेली भवन पाटील मळा , खडकारोड येथे मार्गशीर्ष कृ १३ शके १९४६ शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन आदरांजली वाहण्यात येणार आहे .तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ शहर तेली समाज कार्यकारिणीने केले आहे .


