जळगाव – जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार असल्याची मोठी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी केली आहे. या भरतीची प्रक्रिया लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन सुरू करण्याचे सुतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
भरतीमध्ये विविध पदांसाठी मोठ्या संख्येने जागा उपलब्ध असतील आणि योग्य उमेदवारांना संधी मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यक्षेत्रातील सुधारणा आणि वाढीव कार्यक्षमतेसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी यावर अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे. आता या मोठ्या भरतीमुळे अनेक तरुणांना सरकारी नोकर्यांची संधी मिळण्याची अपेक्षा आहे तसेच यामुळे जलसंपदा विभागाच्या कार्यक्षमता वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



