मुंबई – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला काढून खोटा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. यानंतर सायबर पोलिसांनी 12 सोशल मिडीयावरील खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट व्हिडिओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर सेलकडे केली. त्या आधारे गुन्हा नोंदवत, व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणार्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच द्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, फेसबुक या समाजमाध्यमांना नोटीस बजावत, खातेधारकांची माहिती मागविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने अधिक तपास सुरू आहे.


