भुसावळ शहरात गुटखा विक्रेत्यांवर होणार कारवाई ;


भुसावळ : नगरपालिका आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक संयुक्तपणे धडक मोहीम राबविणार आहेत. शहर आणि परिसरातील सर्व महाविद्यालये आणि शाळा यांच्यापासून १०० मीटर परिसरातील
पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या सर्व टपऱ्या आणि दुकानांवर यांचेवर आजपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करणाऱ्या
सर्व व्यावसायिक गाळे आणि दकानांवर
लवकरच हातोडा पडणार असून त्याचे नियोजन करण्यात आले. वर्षानुवर्षे नगरपालिकेची थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. लवकरच त्यांच्यावर मालमत्ता जप्ती आणि लिलावाचेही नियोजन करण्यात येत असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले .