रा. से.यो.+2 स्तरचे विशेष हिवाळी शिबिरचे उद्घाटन उत्साहात

भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयचे रा.से.यो.+2 स्तर चे विशेष निवासी हिवाळी शिबिराचे उद्घाटन ज्ञानज्योती विद्यालय खडके येथे सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.. मोहन फालक यांनी भूषविले, प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक ,सचिव .विष्णू चौधरी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती स्वाती पाटील उपस्थित होते. तसेच स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव केशव काका धांडे , शाळा समिती चेअरमन प्रमोद भोळे व ज्ञानज्योती
विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरेश्वर प्रकाश बऱ्हाटे यांची विशेष उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.पी. निळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करून स्वयंसेवकांना शिबिराबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष मोहन फालक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोरेश्वर प्रकाश बऱ्हाटे सरांनी स्वयंसेवकांना स्वतःसाठी न जगता समाजासाठी आपण जे देणे लागतो ते कशा पद्धतीने पूर्ण करावे, त्यात आपले कर्तव्य काय असते त्यातून मार्ग काढत समाजसेवा कशी करावी हे समजावून, यासाठी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजना कशा पद्धतीने मदत करते हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस एम फेगडे , आभार प्रदर्शन एस के चौधरी यांनी केले राष्ट्रीय सेवा योजना समितीतील इतर सदस्य श्री,एन, एस. गवळी ,सौ. एस. एल. महाजन उपस्थित होते.