भुसावळ : रेल्वेच्या विद्युत लोको शेडमधील सुमारे ५० फूट उंचावरून लोखंडी अँगल पडल्याने धावपळ उडाली. ही घटना रविवारी घडली. सुटीचा दिवस असल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी कर्मचारी कामाला असतात. रविवार असल्या सुटी होती. काही कर्मचारीच कामाला होते. हा अँगल पडल्याने मोठा आवाज झाला. या घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.



