जळगाव – काचेची बाटली फेकून का मारली असा जाब विचारल्याच्या कारणावरून आदित्य दीपक हातागडे (16, रा.जुने बी.जे.मार्केटच्या बाजूला) या मुलाला तीन जणांनी लोखंडी वस्तूने पोटावर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना 1 डिसेंबर रोजी जुने बी. जे. मार्केटच्या बाजूला कोंडवाडा परिसरात घडली. याप्रकरणी उशिराने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंडवाडा परिसरात राहणारा आदित्य हातागडे याला एका जणाने काचेची बाटली फेकून मारली. त्याने जाब विचारला असता तीन जणांनी शिवीगाळ, मारहाण करत लोखंडी वस्तूने पोटात मारून दुखापत केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मारहाण करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


