भुसावळ,
श्री सद्गुरू झेंडूजी महाराज (बेळीकर) लेवा पाटीदार समाज संस्था व महालक्ष्मी ग्रुप भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा व सूची प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता संतोषी माता वहुउद्देशिय हॉल, मातृभुमी चौक, येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात वधु-वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा तसेच विशेष प्राविण्य संपादन केलेल्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात येणार आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती. रक्षाताई खडसे यांचा विशेष सत्कार समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. माजी मंत्री विधानपरिषदचे आमदार एकनाथराव खडसे, भुसावळ विधानसभेचे आमदार. संजयभाऊ सावकारे, कुटुंबनायक ललितकुमार पाटील, सुधीर पाटील, वासुदेव इंगळे, रमाकांत भारंबे, जगदीश भंगाळे, विनोद वारके, हेमंत मंगाळे, उज्वल चौधरी . रघुनाथ रोटे, पुरुषोतम भारंबे, हरी राणे, गिरधर राणे उपस्थित असतील.
सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी केले आहे.


