मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आदिलाबाद ते दादर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील पुढीलप्रमाणे-

अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती अनारक्षित विशेष – २ सेवा
गाडी क्रमांक 01218 विशेष गाडी अमरावती येथून दि. ५.१२.२०२४ (गुरुवार) रोजी १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 01217 विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ७.१२.२०२४ (शनिवार) रोजी ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी
आदिलाबाद – दादर – आदिलाबाद अनारक्षित विशेष – २ सेवा
ट्रेन क्रमांक 07058 विशेष ट्रेन आदिलाबाद येथून दि. ५.१२.२०२४ (गुरुवार) रोजी सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 07057 विशेष ट्रेन दादर येथून दि. ७.१२.२०२४ (शनिवार) रोजी ०१.०५ वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.
थांबे: किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, एचएस नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण.
संरचना: १४ सामान्य द्वितीय श्रेणी
सर्व अनुयायांना विनंती आहे की कोणत्याही खोट्या बातम्या/अफवांवर विश्वास ठेवू नये.
रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या – जाणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.


