भुसावळ – दिव्यांग बंधू-भगिनी व त्यांच्या पाल्यांचे अशा कार्यक्रमाद्वारे मनोबल, धैर्य वाढावे तसेच उत्कृष्ट, सामाजिक घडामोडी, समाजातील आपले स्थान,अनुभवी आचार – विचारांचे आकलन करून समाजात व आयुष्यात यशस्वी होण्यास मदत व्हावी या उद्देशाने म्हणून दिव्यांग दिनानिमित्त समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिव्यांग सुवर्णक्षण सोहळयाचे आयोजन दिनांक ८ डिसेंबर रविवार रोजी सकाळी ११ वाजता मारवाडी गल्ली , आय, जी. जैन यांच्या घराजवळ करण्यात आले आहे .
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिव्यांग बंधू भगिनी व त्यांची पाल्य यांनी वर्षभरात मिळवलेल्या उत्तुंग यश व उत्कृष्ट कामगिरी बाबत त्यांचे कौतुक सोहळा आयोजित करत असतो यावर्षी म्हणजे सन २०२४ मध्ये सुद्धा सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. उपस्थितीचे आवाहन समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्था भुसावळ.तर्फे करण्यात आले आहे .



