यावल न्यायालयात 14 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन –

यावल – यावल न्यायालयात येत्या शनिवार, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांच्या नियमित कार्यक्रमांतर्गत यावल न्यायालयातील विधी सेवा समिती व स्थानिक वकील संघ यांच्या वतीने सदर राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने या राष्ट्रीय लोक आदालतीमध्ये प्रलंबित दावे, दाखल पूर्व प्रकरणे सादर करून तडजोडीने आपल्या प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर.एस.जगताप यांनी केले आहे.