भुसावळ – दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक 26/11/2024 रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिके च्या वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ आर पी फालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, उद्देशिकेतील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची शपथ. तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केलेली व्यसनमुक्त राहण्यासाठीची शपथ घेतली. त्याचप्रमाणे 26 /11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ संजय बाविस्कर यांनी उपस्थितांना संविधानाची तसेच व्यसनमुक्तीची शपथ दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी भारताचे संविधान लिहित असताना भारतीय नागरिकांना समानता, स्वतंत्र्यता आणि संविधानिक अधिकार या बद्दल ची माहिती दिली. आणि देशाची घटना कशा पद्धतीने जगातील एक उत्कृष्ट राष्ट्र घटना आहे हे स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील यांसह प्रा.डॉ. संजय विठ्ठल बाविस्कर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. आर डी भोळे, महिला अधिकारी प्रा.संगीता धर्माधिकारी प्रा. श्रेया चौधरी डॉ. गोविंदा पंडित वाघुळदे प्रा. डॉ. अंजली पाटील प्रा. राजेंद्र भोळे प्रा. संजय देविदास चौधरी प्रा. डॉ.जयश्री सरोदे प्रा डॉ. अनिल सावळे शिक्षकेतर श्री सुनील ठोसर श्री मिलिंद नेमाडे श्री सुधाकर चौधरी श्री राजेश पाटील श्री प्रमोद नारखेडे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय धर्मा चौधरी सर कळवितात



