भडगाव

दि.21 रोजी मा आ. सतिष भास्कर पाटील व नवाज सैय्यद यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्याबाबत तसेच माळी समाजाबद्दल नको ते अश्लील पोस्ट टाकल्याबद्दल त्या दोघांवर गुन्हा दाखल करावा असे निवेदन सोमवार रोजी समस्त माळी समाजातर्फे तहसिलदार शितल सोलाट व पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना देण्यात आले.
या निवेदनात नमूद केले आहे की, मा. आ.सतिष भास्कर पाटील, रा. पारोळा , नवाज सैय्यद, रा. कासोदा, ता. एरंडोल, यांनी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत तक्रार करीत आहोत. इन्स्टाग्राम व व्हॉडअॅप या सोशल मिडियावर मा. आ. सतिष भास्कर पाटील व नवाज सैय्यद यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईल वर दि. २१/१०/२०२४ रोजी एक पोस्ट प्रकाशित करण्यात आली, ज्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे मजकुर / दृश्य / व्हिडीओ / फोटो होते. संबंधीत पोस्टमध्ये माळी समाजाविषयी नको ते अश्लिल पोस्ट टाकल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर पोस्टमुळे समाजाच्या संतप्त भावना असुन सतिष भास्कर पाटील व नवाज सैय्यद यांच्याविरुद्ध समाजात रोष निर्माण होऊन वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. ही कृती भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६, २९९, ३५३ (२) अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.तरी आमची समस्त माळी समाजाच्या सतिष भास्कर पाटील व नवाज सैय्यद यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार असुन आपण सदर प्रकरणाची चौकशी करुन संबंधीत व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर करावी असे निवेदन देण्यात आले. या वेळी एकनाथ गरबड महाजन, शिवदास आप्पा महाजन,साहेबराव महाजन, विजय महाजन, मुकुंदा महाजन, भिकण महाजन, विष्णू महाजन, विनोद महाजन, गणेश महाजन, सखाराम महाजन,लक्ष्मण महाजन, अनिल महाजन, गौरव माळी, मनोज महाजन, प्रदिप महाजन, सुरेश महाजन, सागर महाजन, विकास महाजन, नितिन महाजन,सागर महाजन, संतोष महाजन, देवराम महाजन, विजय माळी,ललित महाजन, जीवन महाजन, दयाराम वाघ, रमेश महाजन, शुभम महाजन, दिनेश माळी, भीमराव महाजन, मधुकर महाजन, दीपक माळी , दत्तात्रेय महाजन, मनोज महाजन, अवधूत महाजन, सोपान महाजन आदिंसह माळी समाज बांधव उपस्थित होते.


