काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतीभा शिंदेसह नूतन जिल्हाकार्याध्यक्ष भगतसिंह पाटील व अविनाश भालेराव यांचा सत्कार ;


जळगाव – कॉग्रेंस भवन जळगांव येथे आज सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी प्रदेश उपाध्यक्ष व प्रभारी जळगांव , धुळे , नंदुरबारच्या सौ प्रतीभा ताई शिंदे यांचा वाढदिवस तसेच रावेर लोकसभा नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंह पाटील व जळगांव लोकसभा अविनाश भालेराव यांच्या सत्कारार्थ आयोजित कार्यक्रमात आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ प्रतिभा ताई शिंदे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष दादा चौधरी ,ऍड सलीम पटेल, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, प्रभाकर अप्पा सोनवणे, नगर अध्यक्ष दारा मोहम्मद,माजी जिल्हाअध्यक्ष राजु पाटील, डॉ अनिल शिंदे, जळगांव शहर अध्यक्ष शाभ भाऊ तायड़े, जगपाल सिंह गिल, उपस्थित होते

सर्व प्रथम नवनियुक्त जिल्हा कार्य अध्यक्ष भगतसिंह पाटील व अविनाश भालेराव यांच्या सत्कार प्रतिभा ताई शिंदे व आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पुष्प गुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
यां नंतर आमदार शिरीष दादा चौधरी यांनी प्रतिभा ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून सत्कार केला .
यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी व सौ प्रतीभा ताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले पक्षांतर्गत असलेली गटबाजी दुर करून पक्ष बळकट करण्यासाठी कार्य करावें असे आवाहन केले

तसेच सत्काराला भगत सिंह पाटिल व अविनाश भालेराव यानी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक6 शहर अध्यक्ष शाम तायड़े यानी केली सुत्र संचलन मो मुनव्वर खान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग यानी केले प्रसंगी जिल्ह्यातील आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी प्रतिभा ताई शिंदे, भगतसिंह पाटील व अविनाश भालेराव यांच्या सत्कार केले