भुसावळ – केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नानंतर राजधानी एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आल्याने भुसावळसह विभागातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. यापूर्वी हा थांबा नसल्याने रेल्वे प्रवाशांना जळगाव गाठून प्रवास करावा लागत होता मात्र खडसेंच्या प्रयत्नानंतर आता या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यानंतर प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

तीन गाड्यांना मिळाला थांबा
मध्य रेल्वे अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ, मलकापूर व नांदुरा येथे विविध रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आता नांदुरा स्टेशनवर 12113/12114 पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस तसेच मलकापूर स्टेशनवर 22117/22118 पुणे-अमरावती एक्सप्रेस तर भुसावळ स्टेशनवर 22221/22222 मुंबई -दिल्ली राजधानी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, या गाड्यांना थांबा प्रत्यक्षात कधीपासून सुरू होणार याबाबतचे सर्क्यलर लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.


