9 वर्ष झाले तरी अमृत योजनेचे काम रखडलेलेच ; अमृत एकचे काम घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका -उबाठा शिवसेनेची मागणी


,
भुसावळ – भुसावळ शहरात अमृत 1पाणी पुरवठा योजना याआधी अपूर्ण अवस्थेत आहे. त्या साठी शासनाने 65कोटी रु मंजूर केलेले होते, त्या योजनेला 9 वर्ष झाली तरी सुध्धा कॉन्ट्रॅक्टरने ती योजना पूर्ण केलेली नाही त्या मुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून यांची अनामत रक्कम जप्त करावी व महाराष्ट्र शासनाने भुसावळसाठी अमृत 2ही 137 कोटीची योजना मंजूर केलेली आहे त्या योजनेचे टेंडर निघालेले आहे अमृत 2 योजना लवकरात लवकर व्हावी यासाठी हे काम सक्षम व दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर देण्यात यावे अन्यथा कोट्यवधी रुपयाची ही योजना अपयशी ठरल्यास शहरातील नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल
तरी हे काम सक्षम कॉन्ट्रॅक्टर लाच देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उबाठा च्यावतीने करण्यात आली आहे याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .

यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,निलेश महाजन,बबलू बारहाते,मुकेश गुंजाळ,पप्पू बारसे,दिलीप सुरवाडे,राजू इंगळे,नरेंद्र लोखंडे,रहीम गवळी,अबरार ठाकरे,जितू पाटील,शरद जैस्वाल,पिंटू भोई,सूरज पाटील,बबलू धनगर,शरद जोहारे,रिंकू भोई,शिवसैनिक उपस्थित होते