भुसावळ – शेगांव स्टेशनवर आज “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात अपशिष्ट वस्तूंव्दारे तयार केलेल्या विविध कलाकृतींची विक्री करण्यात आली. उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना अपशिष्ट वस्तूंमधून कलेची निर्मिती करण्याचे महत्व आणि पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरूक करण्यात आले.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कचरा कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे. अपशिष्ट वस्तूंमधून तयार केलेले कला उत्पादने केवळ सुंदरता वाढवत नाहीत, तर यामुळे कचऱ्याची समस्या कमी करण्यासही मदत होते.

शेगांव स्टेशनवरील या उपक्रमाने एक सकारात्मक संदेश दिला आहे की, प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडेसे बदल करून पर्यावरणाचे संरक्षण करणे शक्य आहे. “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या काळातही असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


