भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय , भुसावळ. येथे विशाखा समिती व माता -पालक समिती यांच्या संयुक्त विद्यामाने “महिला सक्षमीकरण” या कार्यक्रमाचे दिनांक – 19/09/2024 गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी भुसावळ येथून डॉ. सुवर्णा गाडेकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल वाणी यांनी केले, प्रास्तविक – माधुरी चौधरी तसेच आभारप्रदर्शन- ज्योती पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य – डॉ.एस .व्ही.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप -प्राचार्य – श्री.वाय .एम. पाटील , पर्यवेक्षिका – श्रीमती स्वाती पाटील,संपूर्ण महिला शिक्षक वृंद आणि विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ.सुवर्णा गाडेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले .

तसेच त्यांनी विविध गोष्टीच्या माध्यमातून आज महिलांनी सक्षम कसे राहावे याचे स्पष्टीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाहाटा महाविद्यालयातील विशाखा समिती व माता पालक समिती यांनी परिश्रम घेतले.



