भुसावळ भाजपा ग्रामीण शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख मेळावा उत्साहात संपन्न :


भुसावळ – मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांचा मेळावा मतदार संघाचे लाडके व कार्यसम्राट आमदार संजयभाऊ सावकारे साहेब तथा गुजरात येथून आलेले मतदार संघाचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री प्रदीप जी परमार तसेच भाजपा जिल्हाअध्यक्ष अमोल दादा जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्री परमार साहेब यांनी मतदारसंघात सावकारे साहेब यांचा निवडून येण्याचा आलेख दर पंचवार्षिक उंचावित असून या पंचवार्षिक मध्ये त्यांना लाखाचा लीड मिळावा यासाठी या मतदारसंघात सर्वांनी अथक प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी ठाण मांडून आहे त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे असा आग्रह त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केला
त्याचबरोबर मतदार संघाचे आमदार संजय भाऊ सावकारे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी पक्षनिनिष्ठा सिद्ध केलीली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता यावी यासाठी सर्वांनी आता परिश्रम घ्यायचे आहेत असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशांत भाऊ पाटील यांनी तर वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील जी काळे, अमोल दादा जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार संजय भाऊ सावकारे साहेब यांच्या कार्य व कर्तृत्वाचे कौतुक केले
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पाटील महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष मनोज भाऊ बियानी भाजपा जिल्हा महामंत्री परीक्षित भाऊ बराटे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल दादा वारके शेतकी संघाचे चेअरमन ज्ञानदेवशेठ झोपे जिल्हाचिटणीस भालचंद्र दादा पाटील , गोलू भाऊ पाटील, सुनील दादा महाजन, समाधान आप्पा पवार योगेश जी पाटील पुरुषोत्तम महाजन सदानंद उन्हाळे सह मान्यवर तसेच शेकडो बूथ प्रमुख व शक्ति केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस आनंद ठाकरे यांनी केले