भुसावळ – ईद मिलाद-उल-नबी निमित्त दावत इस्लामी इंडियाचा सामाजिक विभाग, गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन जीएणआरएफ यांच्या वतीने डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये फळे आणि अन्न पॅकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यचे उद्देश ईद मिलादुंननबीचा आनंद गरीब आणि आजारी लोकांमध्ये सामायिक कार्याचा होता
गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन हे नेहमीच समाजसेवा आणि कल्याणकारी कार्यात अग्रेसर राहिले आहे आणि हा उपक्रम या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे
यावेळी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.इल्हास पाटील यांनी जीएनआरएफच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना लागणारी मदतीचे आश्वासन दिले

यावेळी दावत-ए-इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी,
जीएनआरएफ विभागाचे रफिक रोशन कादरी, शोएब अत्तारी मौलाना जुल्फिकार मिसबाही, हाफिज कासिम जावेद अत्तारी, अझहर कादरी अमीन अत्तारी, वसीम अत्तारी, साबीर मन्यार, हाजी तनवीर अत्तारी, युसूफ बरकती, फरीद शेख हाजी शाकीर, आसिफ अत्तारी, फरदीन, मोहम्मद रजा, मो. मोहम्मद फैजान, कैफ, शादाब, आतिफ, फरदीन
त्यांनी प्रयत्न केला




