भुसावळ येथे तरुणांचा शिवसेनेत दिमाखदार प्रवेश !


भुसावळ – पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून खडका येथील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खडका परिसरातील नवीन वस्तीतील ७० तरुणांनी शिवसेना पक्ष हा बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल अशा भावना व्यक्त करुन पक्षप्रवेश केला. तसेच येथे शिवसेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रास्ताविक उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख दिलीप सुरवाडे यांनी केले. शाखा फलकाचे उद्घाटन तालुका प्रमुख निलेश महाजन यांनी केले.
याप्रसंगी तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख दिलीप सुरवाडे, उप तालुका प्रमुख रहिम गवळी, शहर प्रमुख दीपक धांडे, शहर प्रमुख बबलू बराटे, ज्येष्ठ शिवसैनिक एड. श्याम श्रीगोंदेकर,दीपक सुर्यवंशी, राजू चौधरी, शाखा प्रमुख रशीद खान, अमजद खान,नवीन शाखा सदस्य व परिसरातील बंधु भगिनींची उपस्थिती होती.