लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर आणि पनवेल-छपरा विशेष गाड्यांच्या ६२ सेवा

मुंबई – रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर आणि पनवेल-छपरा विशेष गाड्यांच्या ६२ सेवा चालवणार आहे.

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा चालवणार आहे:

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- गोरखपूर द्वि-साप्ताहिक विशेष (४० सेवा)

05326 विशेष दि. २६.०९.२०२४ ते दि. ३०.११.२०२४ या कालावधीत गुरुवारी आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १०.२५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. (२० सेवा)

05325 विशेष गाडी दि. २४.०९.२०२४ ते दि. २८.११.२०२४ या कालावधीत मंगळवार आणि गुरुवारी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. (२० सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद.

संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी (१८ डब्बे)

पनवेल-छपरा साप्ताहिक विशेष (२२ सेवा)

05070 विशेष गाडी दि. २२.०९.२०२४ ते दि. ०१.१२.२०२४ या कालावधीत दर रविवारी पनवेल येथून २३.२० वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. (११ सेवा)

05069 विशेष दि. २१.०९.२०२४ ते दि. ३०.११.२०२४ या कालावधीत दर शनिवारी छपरा येथून १३.१५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २२.०० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, वाराणसी, जौनपूर, औंडिहार, गाझीपूर शहर आणि बलिया.

संरचना: १० तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ५ शयनयान, ५ गैर-वातानुकूलित चेअर कार (अनारिक्षित) १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२२ डब्बे)

आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 05326 आणि 05070 च्या सेवांसांठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १७.०९.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.