भुसावळ:- शहराजवळील साकेगाव येथे सातव्या दिवशी १५ सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन करण्यात आले. गावातील मुख्य चौकातून मिरवणूक काढण्यात आली.


ढोल ताशे ,बँड पथकाच्या तालावर बेधुंद होऊन नृत्य करणाऱ्या तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत होता यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती, वाघुर नदीपात्रामध्ये विसर्जन करण्यात आले.
एपीआय जनार्दन खंडेराय, पीएसआय मंगेश दराडे, गोपनीय जय विनोद पाटील विनोद सोनवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.



