नाहाटा महाविद्यालयात भारतीय ज्ञान पद्धती विषयावर कार्यशाळा संपन्न


भुसावळ – कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय “भारतीय ज्ञान पद्धती या विषयावर सामाजिक शास्त्रमंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेत NEP 2020 नुसार प्रथम वर्ष कला, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या अभ्यासक्रमानुसार विविध मुद्द्यांवर विषयतज्ञ बोलावून मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 9 वाजता महाविद्यालयातील वाचनकक्षात संपन्न झाले .याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. प्रशांत देशमुख ए .आर. बी. गरुड महाविद्यालय ,शेंदुर्णी यांच्या शुभहस्ते झाले .याप्रसंगी कला शाखेचे समन्वयक प्रा.दीपक पाटील उपस्थित होते . प्रास्ताविक प्रा. डॉ .प्रफुल्ल इंगोले (समन्वयक) यांनी केले. याप्रसंगी डॉ.ममताबेन पाटील (समन्वयक) डॉ. सचिन राजपूत( सह समन्वयक) हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एकता बजाज व प्रा डॉ.सपना जंगले यांनी केले.
प्रथम सत्रात “प्राचीन भारतीय शिक्षण व विद्यापीठे “या विषयावर प्रा.डॉ.प्रशांत देशमुख यांनी सादरीकरण केले यात त्यांनी तक्षशिला, नालंदा, काशी इ. प्राचीन विद्यापीठ व तेथील शिक्षण प्रणाली, विद्वान,आचार्य इत्यादीबद्दल माहिती दिली. तसेच भास्कराचार्य , कौटिल्य व परकीय प्रवाशांची प्रवास वर्णन इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली.
दुसऱ्या सत्रात” प्राचीन कला व स्थापत्य “या विषयावर प्रा डॉ.पंकज कुमार प्रेमसागर,( श्री .जी .जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांनी सादरीकरण करून माहिती दिली. त्यात त्यांनी प्राचीन स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला, धातूकाम इत्यादी बद्दल विशेष असे मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात “प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र” या विषयावर मनोज कुमार जाधव यांनी उद्बोधन केले .त्यात त्यांनी प्राचीन विद्वान चरक तसेच प्राचीन वनौषधी, आयुर्वेदचिकित्सा पद्धती इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी .एच.बऱ्हाटे हे उपस्थित होते त्यांनी प्राचीन शिक्षण व ज्ञान हे त्या काळातील सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट होते असे सांगितले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एस. टी.धूम, प्रा.के.पी. पाटील, प्रा.डॉ.किरण वारके, प्रा. व्ही.ए.सोळुंके ,प्रा.डॉ.रश्मी शर्मा, प्रा .श्रीपाद वाणी, प्रा डॉ.सचिन राजपूत ,प्रा.भूषण चौधरी, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.खिलेश पाटील, प्रा.स्वाती शेळके, प्रा.पूनम महाजन, प्रा.आकाश तायडे,प्रा.श्रुती नेवे, प्रा. सोनिया टेकवाणी, प्रा.नंदिनी दायमा, प्रा.प्रियंका खडसे यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ –कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील सोबत प्रा.डॉ. प्रशांत देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद