भुसावळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बसवलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. पुतळा कामात भ्रष्टाचार झाल्याने राज्यभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आदेशानुसार दोषींविराधात कारवाई करण्यातसाठी प्रशासनाला निवेदन दिली जात आहे. भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्फत राज्यपालांना बुधवारी निवेदन देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाणांसह अधिकारी, बांधकाम ठेकेदार व अभियंता आदींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.


निवेदन देताना शहराध्यक्ष रवींद्र निकम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, महिला शहराध्यक्ष यास्मीन बानो, असगर भाई, सागर वानखेडे, सुजाता सपकाळे, वंदना चव्हाण, अनवर तडवी, अमीन तडवी, जफर पिंजारी व पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते.


