ऑनलाईन फसवणूक प्रकरणी भुसावळातील तिघे दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : ऑनलाईन फसवणूक प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भुसावळातील तिघा तरुणांना अटक केली आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली.
दिल्लीच्या साऊथ वेस्ट सायबर सेल पोलिसांनी शहरातील जयेश अनिल भोळे (रा.दत्त नगर), राकेश नामदेव जाधव (रा.भुसावळ) व हर्षवर्धन भोसले यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी न्यायालयाकडून ट्रांझीट रीमांड घेत त्यांना पथकाने दिल्ली येथे नेले. तिघांवर फसवणूक संशयातून कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर दिल्ली येथील पोलिसांनी याप्रकरणी काहीही माहिती देण्यास नकार दिला.