ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये पद्यपठण स्पर्धा संपन्न.


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता नर्सरी,ज्युनियर केजी व सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांसाठी पद्य पठण स्पर्धा घेण्यात आली.यावेळी सुमारे तीनशे विद्यार्थी उपस्थित होते. त्यातील १४५ विद्यार्थ्यांनी सहभागा नोंदवला, शाळेच्या प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.परीक्षक म्हणून सोनाली मुजुमदार व प्रिया रायन यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन लोरेटा ब्राऊन यांनी केले,आभार स्मिता जाधव यांनी मानले.यावेळी पालक वर्गाची उपस्थितीत होते
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

फोटो कॅप्शन – पद्यपठन स्पर्धेतील विद्यार्थ्यांसोबत निना कटलर,प्रिया रायन,लॉरेटा ब्राऊन,स्मिता जाधव,सोनाली मुजुमदार,स्मिता नन्नवरे,बरलीन छाबडा व इतर.