सरिता वासवाणी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती :

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील आर एस आदर्श हायस्कूल च्या शिक्षिका सरिता विजय वासवाणी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद पूर्व विभाग महिला जिल्हाअध्यक्ष पदावर नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.

भुसावळ येथे संपन्न झालेल्या शिक्षक मेळाव्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष भरत शिरसाट, इस्तू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, साहित्यिक डॉ मिलिंद बागुल, डॉ. संजू भटकर, भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, नेहरू विद्यामंदिर तळवेल चे मुख्याध्यापक एस एस अहिरे, विज्ञान संघटनेचे सुनील वानखेडे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, आर आर धनगर, आर एस अडकमोल, डी पी तायडे, आधी उपस्थित होते. सदर कार्यक्रम पी एस सोनवणे सर यांच्या उपस्थितीत पार पडला.