भुसावळ तेली समाजातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव :

भुसावळ – येथील समस्त तिळवण तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खडका रोड येथील समाजभवनामध्ये अध्यक्ष संजय श्रावण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली

प्रारंभी संजय चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ज्येष्ठ सभासद चंदू चौधरी व नारायण चौधरी यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . यावेळी कोषाध्यक्ष सुधाकर पाटील यांनी आर्थिक अहवाल सादर केला अनेक विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात येऊन संजय चौधरी यांनी आज सामाजिक कार्य करण्यास कोणास वेळ मिळत नाही परंतू जे कार्य करतात त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तसेच यावेळी समाजातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समाजातर्फे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला . यामध्ये जिनिशा योगेंद्र चौधरी , तेजस्विनी संजय चौधरी , यश किरण पाटील ,अथर्व राजेश चौधरी ,गणेश संजय सोनवणे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला . तर कादंबरी चौधरी व यशश्री चौधरी या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून समाजाचे आभार मानले . वाय एस चौधरी सर , सुनील चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासा विषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे ध्येय डोळ्यासमोर ठेवून चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे मत अध्यक्ष संजय चौधरी यांनी व्यक्त केले . याप्रसंगी नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षक संजय सांडू चौधरी यांचाही अध्यक्षांचे हस्ते सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अशोक चौधरी तर आभार गणेश सोनवणे यांनी मांनले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चौधरी ,सुरेश चौधरी ,अशोक चौधरी ,सुधाकर पाटील, सुनील सर , गणेश सोनवणे , बाळू चौधरी ,देविदास चौधरी ,दिलीप चौधरी ,किरण चौधरी ,गोपाळ चौधरी ,विजय चौधरी, राकेश चौधरी ,सुभाष चौधरी ,नरेंद्र चौधरी ,सुनील चौधरी ,प्रदीप चौधरी यांनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते