गणेश सरोदे 31 मे रोजी सेवानिवृत्त :

भुसावळ – येथील रहिवासी तथा मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश प्रल्हाद सरोदे आज शुक्रवार, दि. 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहे. भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 22 वर्ष तर जिल्हा परिषद मराठी शाळा सालबर्डी येथे 5 वर्ष अशी एकूण 27 वर्ष त्यांनी शिक्षणक्षेत्रात सेवा दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षणक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवार, दि. 2 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्रीकृष्ण मंदिराजवळ रोटरी क्लब भुसावळ येथे सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला आहे.